व्हिडिओ: युती सरकारविरोधात महाराष्ट्र सैनिक व शेतकऱ्यांचा महासागर लोटला, महिलांचा मोठा सहभाग

औरंगाबाद : राज्यातील ग्रामीण भागात बळीराजा दुष्काळाच्या झळा सोसत असताना भाजप आणि शिवसेना धार्मिक व जातीय मुद्दयांमध्ये मश्गुल झाली आहे. दरम्यान, दुष्काळासारख्या गंभीर मुद्यांवर झोपलेल्या भाजप – शिवसेना सरकारला जागं करण्यासाठी मनसेचा महाराष्ट्र सैनिक आणि मराठवाड्यातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.
मुख्य म्हणजे या दंडुकामोर्चाला कार्यकर्त्यांचा आणि शेतकऱ्यांचा अलोट जनसागर लोटल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध समस्या अधोरेखित करण्यासाठी आणि दुष्काळासारख्या गंभीर मुद्यावर झोपलेल्या भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी औरंगाबाद येथे भव्य दंडुका मोर्चाचे आज आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मोर्चासाठी येताना स्वत: जवळ कोणतेही शस्त्र बाळगू नये याची दक्षता घ्यावी आणि पोलिसांनी दिलेल्या परवानगीमधील सर्व अटींचे तंतोतंत पालन करावे. तसेच कायद्याचा आदर राखावा, असं आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केलं होते.
वास्तविक देशभर विश्व हिंदू परिषद, आरएसएस आणि बजरंगदल अशा अनेक हिंदुत्ववादी संघटना मोर्चे आयोजित करताना धारधार हत्यार आणि बंदुका खुलेआम नाचवताना दिसतात. वास्तविक अशा आंदोलनावर कधीही कोणी पोलिसांकडे तक्रार करत नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबाद येथे शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडण्यासाठी आणि दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावर भाजप-शिवसेना सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित केलेल्या या “दंडुका मोर्चात” दंडुक्यावरच आक्षेप घेण्यास सुरुवात केल्याने, पोलिसांनी त्यासाठी मनसेला एक नियमावली आखून दिली आहे. कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचे उलंघन न करता या मोर्चाला तुफान प्रतिसाद लाभला आहे.
असा लोटला जनसागर
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं