नाशिक विधानपरिषद निवडणूक, राष्ट्रवादीला मनसेचा पाठिंबा

नाशिक : अत्यंत अटीतटीची होणारी नाशिक विधानपरिषदेची निवडणूक ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारांमध्ये रंगणार असल्याने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच प्रत्येक मत हे महत्वाची भूमिका बजावणार आहे.
हा तिरंगी सामना मुख्यत्वे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार परवेज कोकणी यांच्यात होणार आहे. आज स्वतः राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक मध्ये दाखल होतील त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांशी चर्चा होईल असं वृत्त आहे.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींची या निवडणुकीत महत्वाची भूमिका असणार आहे. त्यालाच अनुसरून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस राहुल ढिकले यांनी पत्रकारांना दिली आहे. राष्टवादीच्या गोटात अजून एक मित्र आल्याने राष्ट्रवादीची बाजू अजून बळकट झाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं