VIDEO: तुलसी जोशींचा दणका; शिवसैनिकाचे पैसे बिल्डरने परत केले, शिवसैनिकाने मानले राज ठाकरेंचे आभार

पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलप्रत्येक त नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. परंतु विषय आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिवसैनिक आणि त्यांच्या सामान्य कुटुंबियांशी संबंधित असल्याने विषयाला वेगळेच महत्व प्राप्त होते.
मुंबई वरळी कोळीवाडा येथे राहणारे शिवसैनिक शरद कडू आणि त्यांच्या पत्नी निकिता कडू यांनी कष्टाच्या पैशाने स्वतःचे घर घेण्यासाठी एका प्रकल्पात बुकिंगसाठी सुरुवातीला पावणे तीन लाख २०१२ मध्ये मोठ्या आशेने गुंतवले होते. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून संबंधित प्रकल्प मार्गी लागला नाही आणि कष्टाचे पैसे देखील ५ वर्षांपासून संबंधित बांधकाम व्यवसायिक परत देत नव्हता. शरद कडू यांच्या कुटुंबाने अनेक वर्ष त्यांना ३ महिन्याने या किंवा सहा महिन्याने या असे करत ५-६ वर्ष झुलवत ठेवले होते. विशेष म्हणजे शिवसेना सत्तेत असल्याने आणि स्वतः शिवसैनिक असल्याने त्यांनी अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी भेटीगाठी घेतल्या. मात्र सर्वांनी त्यांच्या अडचणींकडे कानाडोळा केला आणि बिल्डरने तसेच शिवसैनिकांनी देखील त्यांना न्यायालयात जाण्याचे फुकटचे सल्ले दिले. आपले कष्टाचे पैसे बुडाले अशीच भावना त्यांच्या कुटुंबियांच्या मनात निर्माण झाली होती.
कंटाळलेल्या अवस्थेत ते भिवंडी येथील संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात गेले आणि शेवटची विनंती केली. परंतु, तिथे जाण्यापूर्वी त्यांनी समाज माध्यमांवरून मनसेचे पालघरचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांचा मोबाईल क्रमांक मिळवला होता. त्यांनी थेट संबंधित बिल्डरच्या कार्यालयातून तुलसी जोशींकडे विषय सांगितलं, तसेच मी शिवसैनिक असलो तरी एक मराठी माणूस समजून मला आणि माझ्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली. त्यामुळे तुलसी जोशी यांनी देखील पक्ष बाजूला ठेवून त्यांचा विषय समजून घेतला आणि बिल्डरच्या हातात मोबाईल देण्यास सांगितला. त्यानंतर बिल्डरने शरद कडू यांना २०१२ मध्ये गुंतवलेल्या पावणेतीन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
बांधकाम व्यावसायिकाने त्या शिवसैनिकाचे पैसे परत दिल्यानंतर शरद कडू या शिवसैनिकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि तुलसी जोशी यांचे जाहीर आभार मानले आहेत. तसेच राज ठाकरे मराठी माणसाच्या पाठीशी असल्याचा मला शिवसैनिक म्हणून अभिमान वाटत आहे असे म्हटले आहे. वरळी कोळीवाड्यातील शिवसैनिक शरद कडू आणि त्यांच्या पत्नी निकिता कडू यांनी मराठी कुटुंबाला न्याय दिल्याबद्दल राज ठाकरे आणि मनसेचे मनापासून आभार मनात तसा अधिकृत व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं