मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांचं राज ठाकरेंच्या अजान'च्या वक्तव्यावर परखड मत, वक्तव्याचा विपर्यास!

मुंबई : काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यात पदाधिकारी मेळाव्या आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना जैन, राम मंदिर तसेच मुस्लिम समजासंबंधित रोखठोक मत व्यक्त केलं आहे. परंतु संपूर्ण भाषणात त्यांनी जे अजान’च्या संबंधित वक्तव्य केलं, केवळ तेच प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध केलं गेलं आणि मूळ विषयाला बगल देऊन राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं परखड मत मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी व्यक्त केलं आहे.
मनसेच्या मुस्लिम नेत्यांच्या मते राज ठाकरेंच्या त्या विधानाचा प्रसार माध्यमांनी केवळ विपर्यास करून मूळ विषयाला बगल दिली असं परखड मत मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी व्यक्त केलं. तसेच मुहम्मद पैगंबर साहेबांच्या व्यंगचित्रा वरून काही वर्षांपूर्वी जे वाद झाला होता त्यावेळच्या राज ठाकरेंच्या भूमिकेची सुद्धा त्यांनी सर्वांना आठवण करून दिली आहे.
नेमकं काय म्हटलं आहे मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी;
राज साहेबांच्या अजान च्या वक्तव्याचा विपर्यास .?
पुण्याच्या मेळाव्यात राज साहेबांनी जे भाषण केले त्या भाषणाला मी व्यक्तिशः हजर होतो.आणि त्या वेळी जे काही ते बोलले ते आज राजकीय पक्षांन द्वारे सामाजिक आणि जातीय विषयावर केले गेलेले राजकीय षडयंत्र उघडकीस आणतांना त्यांनी काही सल्ले दिले.त्यातूनच अजान बद्धल बोलले…जैन आणि आरक्षण विषयावर भूमिका मांडली.की महाराष्ट्रातील माझ्या मुलांना मुलींना रोजगार मिळावा त्या साठी मी वाट्टेल ते करीन. त्यात महाराष्ट्रातील मुस्लिम,मराठा,आणि सर्वच समाज आलेत.ते हे जे बोलले त्याचे स्वागत करण्याचे सोडून काही संधी साधू विरोधक अजान च्या वक्तव्याचा विपर्यास करून दिशाभूल करत आहेत….
जर राज साहेब जातीय भूमिकेत असते तर काही वर्षांन पूर्वी डेन्मार्क येथे मुहम्मद पैगंबर साहेबांच्या व्यंगचित्रा वरून वादंग झाला त्या वेळी साहेबांनी त्या व्यंग चित्रावर आक्षेप घेतले आणि समाजा च्या बाजूने आपले मत प्रदर्शित केले त्या वेळी साहेब म्हणाले की ज्या व्यक्तीला आपण बघितले आहे त्याचेच व्यंगचित्र काढू शकतो..त्या चित्रकाराने हे प्रताप करायचे न्हव्हते अशी भूमिका साहेबांनी मांडली..त्या वेळेस इतर राजकीय पक्षाचे धुरंधर नेते मूग गिळून बसले साधा निषेध ही केला नाही.राज साहेबांनी जाहीर निषेध केला होता….
माझी सर्वांना विनंती आहे की या विषयाचा विपर्यास करून महाराष्ट्रातील प्रगतीला खीळ बसवणाऱ्या विरोधकांना संधी देऊ नका..वेळ येईल नक्की जर साहेबांचे हाथ आपण बळकट केले .तर रोजगार उपलब्ध होतील.आणि खऱ्या अर्थाने सर्व समाजाला आर्थिक बळ प्राप्त होईल आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल…
तरी माझी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की नवनिर्माणाचे स्वप्न पाहण्यासाठी नेमकी परिस्तिथी काय आहे.याचा अभ्यास करा आणि कामाला लागा पुढील पिढ्या आपल्याला दुवा देतील…
जय हिंद -जय महाराष्ट्र
इरफान शेख.
राज्य सचिव,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं