मनसे उत्तर-भारतीयांची द्वेषी कसं म्हणावं? अविनाश जाधवांमुळे चिमुकली आईच्या कुशीत

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटली की ते उत्तर भारतीय द्वेषी अशी साधारण भावना प्रसार माध्यमांनीच लोकांच्या मनात बिंबवून ठेवली आहे. मग त्यात चुकीची आणि सत्यता न बघता हिंदी प्रसार माध्यमांनी देशभर त्यांच्याबद्दल नाकाराम्तक बीज रोवली. अगदी महाराष्ट्रात रोजगार हा पहिल्यांदा मराठी मुलांनाच असा आग्रह धरला तरी राज ठाकरेंची गुंडगिरी असे मथळे प्रसार माध्यमांमध्ये सहज पाहायला मिळाले. त्यात हिंदी मीडिया नेहमीच अग्रेसर राहिला, परंतु देशातील इतर राज्यात असे विषय उचलले गेले की कोणतीही वाच्यता हिंदी माध्यमं प्रसारित करत नाहीत, हे वास्तव आहे.
मनसेचा जोर हा इथल्या मराठी युवकांच्या हक्काच्या रोजगारापुरता मर्यादित नव्हता, तर इथल्या पायाभूत सुविधांवर देखील किती ताण पडतो हे राज ठाकरे यांनी अनेकदा त्यांच्या भाषणातून व्यक्त केलं आहे. परंतु, त्यामागील वास्तव समजून घेण्यापेक्षा हिंदी आणि मराठी प्रसार माध्यमांनी देखील नंतर त्याच्याविरुद्दच सूर लावून धरला. परिणामी सगळ्याच पक्षांना आणखी बळ चढलं आणि राज्यात मराठी पेक्षा अमराठीच अधिक महत्वाची ठरू लागली. त्याचाच प्रत्यय काही दिवसांपूर्वी आलेल्या संशोधनात राज्यात भविष्यात मराठीचं अस्तित्वच संपुष्टात येण्याची आकडेवारी सांगत आहे.
राज ठाकरे उत्तर भारतीय पंचायतमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जाणार असे वृत्त येताच प्रसार माध्यमांनी प्रत्यक्ष दिवसाची वाट न पाहता अतिउतावळेपणा करत ‘हमार नेता कैसन हो, राज भैया जैसन हो’ अशा मथळ्यांनी चर्चा सत्रच भरवली, हे पाहायला मिळाले आणि थेट त्याचा संबंध देखील उत्तर भारतीय मतपेटीशी जोडण्यास सुरुवात केली. परंतु, प्रत्यक्ष उत्तर भारतीय पंचायतमध्ये राज यांनी याच पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या ताण अधोरेखित केला. त्यात महत्वाचं म्हणजे तिथे देखील त्यांनी मराठीचाच हट्ट केला, परंतु ते मात्र माध्यमांनी राज्याला ओरडून सांगण्याची तसदी घेतली नाही. राज्यातील मराठीच्या अस्तित्वाला भविष्यात धोका पोहोचण्याची अनेक कारणं असली तरी प्रसार माध्यमांनी महाराष्ट्रात केलेली मराठीची गळचेपी देखील त्यातील एक कारण आहे. त्यामुळेच मनसे म्हणजे क्रूर माणसांचा पक्ष अशी मांडणी देशभर केली.
विशेष म्हणजे सध्या उत्तर भारतीयांसाठी सन्मान रॅली काढणारे तर ना मराठीचे राहिले ना मराठीचे, असंच काहीसं ठाण्यात घडला आहे. मोरिया नावाचे उत्तर भारतीय कुटुंबातील महिलेने वाडिया हॉस्पिटलमध्ये एका मुलीला गेल्या महिन्यात जन्म दिला. काही दिवसांनी बाळाला आणि आईला घरी देखील सोडण्यात आले. परंतु त्या नंतर बाळाच्या हृदयाचे ठोके कमी जास्त होण्याच्या त्रास असल्याचे समजताच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या बाळाला मागील महिन्याच्या १८ तारखेला ठाण्यातील वेदांत हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. आर्थिक हलाकीच्या परिस्थितीत असताना तब्बल साडेतीन लाखाचा बिल इस्पितळाने झाल्याचे कळवले. कुटुंबीयांनी डॉक्टरांना बिल कमी करण्यासाठी विनंती देखील केली.
विशेष म्हणजे उत्तर भारतीयांचे मतदानापूर्तीचे स्वयंघोषित कैवारी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील या उत्तर भारतीय कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची विनंती केली, परंतु त्यांच्यामध्ये मेळाव्यांप्रमाणे ‘उत्तर भारतीय सन्मान’ काही जागा झाला नाही. कदाचित ते उत्तर भारतीय कुटुंबीय मुंबईमधले मतदार असावे, ज्यांचा ठाण्यात मतदानासाठी उपयोग नसावा असं राजकीय गणित असावं. एकूणच त्यांना मदत भेटलीच नाही आणि चिमुकली तशीच इस्पितळात पडून होती. त्यानंतर कोणीतरी सदर विषय ठाणे पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे घेऊन गेले. त्यानंतर विषय समजून घेतल्यानंतर अविनाश जाधवत्यांच्या कार्यकर्त्यांसोबत वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांनी बाळाच्या प्रकृतीविषयक आधी संपूर्ण माहिती करून घेतली, मंतर थेट काचेतून बाळाला बाहेर काढलं आणि बाळाच्या आईच्या हातात दिल. त्यांना एवढंच सांगितलं ‘तुम्ही बाळाला घेऊन जावा हॉस्पिटल चा काय ते मी बघतो’. परंतु अनेक दिवसानंतर आपला बाळाला आपल्या हातात घेतल्यानंतर बाळाच्या आई वडिलांना रडू आवरलं नाही आणि त्यांनी थेट अविनाश जाधव यांचे पाय धरून आपल्या भावना व्यक्त केल्या. आता विषय हाच येतो कि माध्यमं जे रंगवतात तशी मनसे आहे का? हिंदी प्रसार किंवा मराठी प्रसार माध्यमं असे विषय देशभर दाखवतील का? उत्तर हे नाहीच असेल.
काय आहे तो नेमकं व्हिडिओ;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं