मनसे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, चाचपणी सुरू : सविस्तर

मुंबई : महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी मनसेकडून आकड्यांची चाचपणी सुरु झाली आहे. त्यानुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे मोदी लाटेत सुद्धा पक्षाला मतदाराने ज्या लोकसभा मतदारसंघात चांगला प्रतिसाद दिला होता, त्याची आकडेवारी समोर ठेऊन मतदारसंघ निश्चिती होणार आहेत. त्यामुळे मोदी लाटेत मिळालेला प्रतिसाद, मतदारसंघ आणि उमेदवार या सगळ्याचा अभ्यास आधीच युद्धपातळीवर सुरु होता असे वृत्त आहे.
दरम्यान मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, सध्या आमची टीम सर्व आढावा घेत आहे आणि मोदी लाटेत सुद्धा चांगली मतं मिळालेल्या लोकसभा मतदारसंघात आम्ही आमचे उमेदवार पूर्ण ताकदीनिशी उतरवण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मतदारसंघ आणि उमेदवारी निश्चित झाल्यावर संपूर्ण पक्ष ताकदीनिशी उमेदवारांच्या मागे ठाम पणे उभा राहून त्या मतदारसंघाचा प्रत्येक कोपरा पिंजून काढेल अशी रणनीती असेल.
मिळालेल्या माहिती नुसार मनसे ७ ते ८ लोकसभा मतदारसंघ निश्चित करेल जे जिंकायचेच आहेत. तसेच या निवडलेल्या ७-८ जागांवर महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष ठाण मांडून बसतील आणि महिला शक्तीचं विशेष पाठबळ सर्वत्र नियोजनबद्ध वापरलं जाईल असे वृत्त आहे. राज ठाकरेंच्या जास्तीत जास्त सभा या मतदारसंघात आयोजित केल्या जातील आणि सत्ताधाऱ्यांविरुद्ध रान पेटवलं जाईल. त्यासाठी मीडिया मॅनेजमेंट सुद्धा नियोजनबद्ध वापरण्याची रणनीती असेल असं समजतं.
राज ठाकरे स्वतः या सर्व विषयावर लक्ष ठेऊन आहेत, परंतु याची कुठेही वाच्यता करण्यात येत नव्हती. सत्ताधाऱ्यांना आणि विशेष करून शिवसेनेला केवळ विकासाच्या मुद्यावर घेरण्याची योजना आहे. सभे दरम्यान शिवसेनेने कितीही राम मंदिर, हिंदुत्व आणि इतर भावनिक विषयाला हात घातल्यास त्यांना केवळ विकासावर बोला आणि १२ मंत्र्यांनी काय दिवे लावले ते सांगा, असे प्रश्न उपस्थित करून निरुत्तर करण्यात येईल. तर राज ठाकरेंच्या भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्ज, दुष्काळ आणि फसव्या सरकारी योजनांचे वाभाडे काढले जातील. तर भारतीय जनता पक्षासाठी विशेष रणनीती आखण्यात येते आहे असं वृत्त आहे.
शिवसेनेच्या सत्ताकाळातील अनुभवातून मराठी माणसाच्या मनात पुन्हा मनसे जागा घेत असून ती शिवसेनेसाठी २०१९ मधील धोक्याची घंटा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत २ जागा जिंकणाऱ्या पक्षाला सुद्धा दिल्लीत मोठी मागणी असणार आहे आणि त्यासाठी प्रत्येक पक्ष सज्ज झाला आहे.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून मनसेचे प्रमोद पाटील यांना मोदी लाटेत सुद्धा १ लाख २२ हजार मतं मिळाली होती आणि विशेष म्हणजे तेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती सुद्धा होती आणि त्यात स्वतः नरेंद्र मोदींनी कल्याणला येऊन शिंदे पुत्रासाठी सभा घेतली होती. त्यामुळे मनसेकडून ईशान्य मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि विदर्भातील वणी तसेच हिंगणघाट अशा प्रभावी ठरणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेले लोकसभा मतदारसंघ निवडले जातील अशी शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं