मनसे कार्यकर्त्यामुळे ७ वर्षांनी बीडचा गणेश डाके कुटुंबियांना सापडला

पालघर : पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि कट्टर राज ठाकरे समर्थक तुलसी जोशी यांच्या पुढाकाराने गणेश पुष्कर डाके हा तरुण तब्बल ७ वर्षांनी त्यांच्या कुटुंबियांना भेटला आहे. गणेश डाके मूळचा बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातील डाळी पिंपरीचा रहिवासी असल्याचे समजते.
गणेश डाके हा मागील सात वर्षांपासून घरातून बेपत्ता झाला होता आणि त्याची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शोधण्याचे खूप प्रयत्नं केले होते, परंतु काहीच फायदा झाला नव्हता. विशेष म्हणजे गणेश डाके अनेक वर्षांपासून केवळ सर्वत्र भटकत होता आणि मिळेल त्या व्यक्तीकडून काही तरी गयावया करत तो पोट भरायचा. दोन दिवसांपूर्वी पालघरमध्ये एक व्यक्ती मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांच्या किराणा मालाच्या दुकानाजवळ येऊन खाण्यासाठी वारंवार हात पसरत होता. त्यामुळे त्याला खायला देऊन सहज विचारपूस केली आणि त्याच्याकडील पिशवीत त्यांना मतदान कार्ड मिळाले. त्यानुसार तो बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातील डाळी पिंपरीचा रहिवासी असल्याचे समजले.
त्यामुळे तुलसी जोशी यांनी मनसे बीड जिल्हा सचिव अभिषेक गोल्हार तसेच मारुती दुनगे यांच्याशी संपर्क साधला व सदर व्यक्तीचा पत्ता शोधण्याची विनंती केली. तोपर्यंत तुलसी जोशी यांनी गणेशला सलूनमध्ये कटिंग, दाडी आणि आंघोळ घालुन पालघर पोलीस टेन्शन’मध्ये घेऊन गेले आणि पोलिसांमार्फत गणेशच्या कुटुंबियांशी बीडला संपर्क साधून त्यांना पालघरला बोलावून घेतले. ७ वर्षांपासून दुरावलेल्या गणेशला पाहून कुटूंबियांना सुद्धा खूप आनंद झाला होता. त्यामुळे इथे तुलसी जोशी यांनी एका जवाबदार नागरिकाप्रमाणे विषय हाताळल्याने गणेश ७ वर्षांनी कुटुंबियांना मिळाला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं