VIDEO: तुलसी जोशींचा कॉल आणि मराठी माणसाचं 'मॅटर सॉल', बांधकाम व्यवसायिकाने धनादेश दिले

वसई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलत नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. त्यापैकीच अजून दोन मदतीची प्रकरण मुंबईतील कुटुंबातून समोर आली आहेत. कारण या मराठी कुटुंबाने कष्टाचा पैसे स्वतःचे घर घेण्याच्या उद्देशाने एका बांधकाम प्रकल्पात गुंतवले होते.
मात्र, पैसे गुंतवून देखील बांधकाम अनेक वर्षांपासून जैसे थे होतं. दरम्यान, या कुटुंबांना घर नाही, परंतु गुंतवलेला घामाचा पैसा तरी परत मिळावा म्हणून बांधकाम व्यावसायिकाकडे अनेकदा तगादा लावला. मात्र सदर मराठी कुटुंबाच्या सर्व मागण्या वारंवार दुर्लक्षित करण्यात येत होत्या. त्यामुळे कष्टाने कमवलेल्या पैशाचं तर पाणी झालं आणि ना स्वतःच्या हक्काची वास्तू देखील मिळाली. परंतु, समाज माध्यमांवरील काही व्हिडिओ मार्फत संबंधित मराठी कुटुंबांनी पालघर मनसेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि थेट कॉल करून संपूर्ण विषयाची त्यांना माहिती करून दिली.
दरम्यान, तुम्हाला काही तासाच्या आतमध्ये न्याय मिळेल असे आश्वासन तुलसी जोशी यांनी संबंधित मराठी कुटुंबांना दिलं. त्याप्रमाणे थेट बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात संबंधित कुटुंब पोहोचले आणि तुलसी जोशी यांना फोन जोडून दिला. त्यानंतर झालेल्या संभाषणाअंती बांधकाम व्यावसायिकाने संबंधित मराठी कुटुंबांना त्यांचे रखडलेले धनादेश परत केले आणि या कुटुंबांनी राज ठाकरेंच्या पक्षाचे, अमित ठाकरे आणि तुलसी जोशींचे आभार मानले आणि मराठी माणसाच्या पाठीशी असेच उभं राहण्याचं आवाहन देखील केलं आहे. संबंधित मराठी कुटुंबांनी तसा अधिकृत व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे.
काय आहे तो नेमका व्हिडिओ?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं