बाप्पा व छत्रपती शिवाजी महाराज; पीडब्लूडी कार्यालयाची तोडफोड पण 'त्या कपाटाचा' मनसे कार्यकर्त्यांनी आदर राखला

नवी मुंबई : नुकताच बांधला गेलेला सायन-पनवेल हायवेची एकाच पावसाने अक्षरशा दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांच प्रमाण इतकं भयंकर वाढलं आहे की तासंतास प्रवाशांचा ट्रॅफिकमध्ये खोळंबा होत आहे. त्यात सरकारला सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे अखेर राज्य सरकारच्या पीडब्लूडी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भे कार्यालयावर मनसेच्या नवी मुंबईतील महाराष्ट्र सैनिकांनी तोडफोड केली आणि परंतु संपूर्ण कार्यालयाची तोडफोड करताना एका कपाटावर गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने आक्रमक कार्यकर्त्यांनी आदर राखत त्या कपाटाला कोणताही स्पर्श केला नाही.
मागील आठवडाभर झालेल्या पावसाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या क्षेत्रातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे आणि त्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांनी अनेकांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात सुद्धा सरकारविरुद्ध चीड असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
त्यामुळे आक्रमक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भे कार्यालयावर हल्ला केला खरा, परंतु त्याच कार्यालयात एका कपाटावर गणपती बाप्पा आणि छत्रपती महाराजांची मूर्ती असल्याने कार्यकर्त्यांनी त्याचा आदर राखत त्या कपाटाला स्पर्श सुद्धा केला नाही. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होते तरी महाराष्ट्राच आराध्य दैवत असलेल्या या मूर्तींचा मनापासून आदर राखला गेला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं