मोदी योग्य टीम लीडर नाहीत, जनता पुन्हा मतं देण कठीण: अर्थतज्ज्ञ मेघनाद देसाई

नवी दिल्ली : मोदींच्या धोरणांमुळे सामान्य माणूस त्रस्त झाला असताना आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ सुद्धा पंतप्रधानांवर टीका करताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदींसाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण, भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ मेघनाद देसाई यांनी सुद्धा नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, त्यांनी मोदींबाबत विधान करताना म्हटले की, २०१९ लोकसभा निवडणुकीत नाराज झालेली सामान्य जनता पुन्हा भारतीय जनता पक्षाला मतं देणार नाही, अशी बोचरी टीका केली आहे.
पुढे बोलताना त्यांनी मोदींबाबत अनेक निरीक्षणं नोंदवली आहेत. ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेन्द्र मोदी योग्य टीम लीडर सुद्धा नाहीत’. त्यामुळे भाजपचा तिळपापड होण्याची शक्यता आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मेघनाद देसाई यांनी असं भाष्य केलं आहे. तसेच २०१४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी गरजेपेक्षा जास्तच खोटी आश्वासनं दिली. तसेच मोदी मंत्रिमंडळापेक्षा काही ठरविक अधिकाऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण देश चालवू लागले आणि हाच विश्वास त्यांना नडला आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुद्धा काम करण्याची त्यांनी हीच नीती वापरली होती. त्यामुळेच सामान्य जनता निराश झाली आहे. तसेच अजूनपर्यंत अच्छे दिन आले नसून ते केवळ निवडणुकांचं मृगजळ असल्याची सर्वसाधारण भावना लोकांच्या मनात निर्माण झाली आहे असं ते म्हणाले. विशेष म्हणजे मोदींकडे खूप मोठी संधी होती, परंतु, सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याची त्यांची भावनाच नसल्याने ते पराभवाच्या छायेत आहेत. तसेच मेघनाद देसाई यांनी मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीवर सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे ‘मोदी हे केवळ एक उत्तम राजकारणी आहेत, पण ते चांगले टीम लीडर नाहीत. त्यांच्या आजच्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज आणि अरुण जेटली वगळता कोणाकडे सुद्धा मोठा अनुभव नाही. आपल्याला पुन्हा सत्ता मिळण्यासाठी इतके परिश्रम घ्यावे लागतील याची मोदींना जराही कल्पना नव्हती. ते भ्रमात राहिले आणि ३ राज्यांमध्ये झालेला पराभव म्हणजे मोदींना सामान्य जनतेने शिकवलेला धडाआहे.
विशेष म्हणजे यावेळी बोलताना मेघनाद देसाई यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं तोंडभरून कौतूक केलं. त्यांची मोदींशी तुलना करता मनमोहन सिंह सर्वात जास्त योग्य आणि अनुभवी असल्याचा त्यांनी शेरा मारला. मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी, अर्जून सिंह, शरद पवार आणि पी चिदंबरम यांच्यासहित अनुभवी नेते होते आणि त्यामुळंच योग्य टीमच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय आर्थिक मंदीच्या काळात सुद्धा देशांतर्गत अर्थव्यवस्था टिकाव धरून राहिली असं ते म्हणाले. आरबीयचे २ गव्हर्नर अशा पद्धतीने जाणं चांगली गोष्ट नसल्याचं त्यांनी नमूद केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं