कल्याणकरांना दुसरं गाजर? ६५०० कोटीच्या प्रतीक्षेत असताना, निविदाच काढल्या नसलेल्या मेट्रो-कामाचे निवडणूक पूर्व भूमिपूजन?

ठाणे : २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण-डोंबिवली शहराला तब्बल ६,५०० कोटींचं गाजर दाखवलं होतं. तेच आश्वासन अजून प्रत्यक्षात पूर्ण झालं नसताना आणि पुन्हा निवडणुका लागताच इथल्या सामान्य लोकांना तोंड तरी कसं दाखवणार या भीतीने भाजपने पुन्हा २०१९ मधील निवडणुका ४-५ महिन्यांवर आल्या असताना इथल्या सामान्यांना पुन्हा निवडणुकीचं गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
कारण भिवंडी-कल्याण या मेट्रोसाठी सरकारकडून अधिकृत निविदा काढण्यात आलेली नसताना सुद्धा या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून केवळ स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. भाजपने केवळ भारतीय जनता पक्षाचा खासदार असलेला मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून मेट्रोची मार्गिका तयार करण्यात आली आहे. परंतु, सामान्य प्रवासी संख्येच्या दृष्टिकोनातून आणि सोयीनुसार ही मार्गिका पूर्णपणे चुकीची आहे आणि हा प्रकल्प तोटय़ाचा ठरणार असल्याचा दावा सुद्धा एनसीपीने केला आहे.
त्याचबरोबर राज्य शासनाने ही मेट्रो भिवंडीकडे वळवून शिवसेनेवर एकप्रकारे कुरघोडी केल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे. एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी मेट्रो भूमिपूजनाच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाकडून सामान्यांची फसवणूक करण्यात येत असल्याची टीका केली आहे. काल्हेर-भिवंडी भागातील आणि कळवा-मुंब्रा, दिवा, डोंबिवली भागातील लोकसंख्येचा आणि प्रवासांच्या संख्येचा तुलनात्मक अभ्यास करून मेट्रो मार्गिका कापुरबावडीमार्गे कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली या मार्गाने करणे अपेक्षित होते. कारण त्यामुळे ही मेट्रो सेवा मध्य रेल्वेशी संलग्न आणि त्याचा थेट फायदा रोज वर्दळ करणाऱ्या लाखो प्रवाशांना झाला असता.
मात्र भाजप केवळ आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि मतांच्या राजकारणासाठी भाजप खासदाराच्या मतदारसंघातून मेट्रो नेण्याचा घाट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे भिवंडीकरांनी कधीच मेट्रोची मागणी केलेली नसून त्यांनी केवळ चांगले रस्ते, पाणी, शौचालये अशा मूलभूत गरजा पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मात्र फडणवीस सरकार त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून याठिकाणी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे केवळ राजकीय हेतूने हा मार्ग भिवंडीमध्ये वळवण्यात आला असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं