आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन

सोलापूर : राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
आज चौथ्या दिवशी रास्ता रोको, रेल रोको नंतर शेतकऱ्यांना जनावरांसह चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलं होतं. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दूध उत्पादक शेतकरी त्यांच्या मुला-बाळांना आणि जनावरांना सोबत घेऊन ग्रामीण भागात रास्ता रोको करताना दिसत आहेत.
शेतकरी थेट दुभती जनावरं घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे एसटीसह इतर प्रवाशांचे हाल होत आहेत. या रास्ता रोकोमुळे ग्रामीण भागातील वाहतूक खोळंबली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं