अटलजींचे निधन नक्की कोणत्या तारखेला? संजय राऊतांना तारखेबद्दल शंका

मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगते अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची केवळ घोषणा करण्यात आली होती, अशी शंका शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२-१३ ऑगस्टपासून मंदावला होता. परंतु पंतप्रधानांच्या स्वातंत्र्य दिनादिवशीच्या भाषणात अडथळा नको, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको या विचाराने वाजपेयींनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला किंवा त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली अशी राऊतांनी उपरोधिकपणे शंका उपस्थित केली आहे.
शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून खासदार संजय राऊत यांनी ही शंका व्यक्त केली आहे. १६ ऑगस्टला सांयकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयाने अटलजींच्या निधनाची अधीकृत घोषणा केली होती. त्याला अनुसरुनच सामना’च्या लेखातून त्यांनी भाजप तसेच मोदींवर निशाणा साधला आहे.
आजच्या लेखात संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘स्वराज्य म्हणजे काय हे जनतेपेक्षा आपल्या राज्यकर्त्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. वाजपेयींचे निधन १६ ऑगस्ट रोजी झाले. पण त्यांची प्रकृती १२-१३ ऑगस्टपासूनच बिघडली होती. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको आणि लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको, तसेच पंतप्रधान मोदींचेही लाल किल्ल्यावरून सविस्तर भाषण व्हायचे होते. या राष्ट्रीय विचाराने वाजपेयींनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला (किंवा त्यांच्या निधनाची घोषणा केली).
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं