VIDEO: नाशिकरांची २०४१ पर्यंत तहान भागवणार; 'राज' स्वप्नं म्हणजे मुकणे पाणीपुरवठा योजना लवकरच सज्ज

नाशिक : नाशिकमधील मनसेच्या सत्ताकाळातील अजून एक महत्वपूर्ण योजना पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण झाली आहे. नाशिक शहरासाठी महत्वाचा आणि २०४१ पर्यंत नाशिक शहराची तहान भागवेल अशी मुकणे पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. सत्ताकाळात राज ठाकरे यांनी या योजनेचे जनतेला जाहीर सादरीकरण सुद्धा केलं होतं. आता त्याच महत्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे.
नाशिक विल्होळी नजीकच्या या नव्या जलशुद्धीकरण केंद्रावर सध्या प्राथमिक चाचण्यासुद्धा सुरु आहेत. सदर योजना लवकरच कार्यान्वित होत असून, त्यामुळे शहराच्या मोठ्या परिसरातील पाणीप्रश्न काही प्रमाणात हलका होणार आहे. आजच्या घडीला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आणि विशेषकरून सिडको परिसरात गंभीर पाणीप्रश्न आहे. त्यावर मुकणे प्रकल्पामुळे मोठा तोडगा निघणार आहे.
योजनेनुसार पहिल्या टप्यात विल्होळी जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पाथर्डी येथील ४ जलकुंभात येईल. परिणामी सिडकोसह दाढेगाव, पिंपळगाव खांब, वाडीचे रान, इंदिरानगर, राजीवनगर, वासननगर, चेतनानगर आणि दिपालीनगर या दाट लोकवस्तीच्या भागातील पाणीपुरवठा सुधारणा होईल. त्याचबरोबर मुंबई-आग्रा महामार्गाच्या दुतर्फा पाथर्डी फाटा ते थेट द्वारकापर्यंतचे जलकुंभ भरून त्या-त्या भागात पाणीपुरवठा होईल. योजना पूर्णपणे आणि ताकदीने कार्यान्वित झाल्यानंतर २०४१ पर्यंतचा शहराचा पाणीप्रश्न मिटणार आहे.
कारण, या २६६ कोटीच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरासाठी टप्याटप्याने दररोज तब्बल ४०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा उपलब्ध होईल. दरम्यान, प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात विल्होळी येथे प्रतिदिन १३७ दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारे केंद्र सुरु होईल. तर २०४१ पर्यंत तितक्याच क्षमतेची अन्य दोन जलशुद्धीकरण केंद्र सुद्धा कार्यान्वित होतील. २०३१ पर्यंत शहराच्या प्रस्तावित ३० लाख, तर २०४१ पर्यंत ४० लाख लोकसंख्येला या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. योजनेच्या पहिल्या टप्यातील प्राथमिक चाचण्यांदरम्यान विल्होळी प्रकल्पात आलेल्या पाण्याची प्रत्यक्ष दृश्य टिपण्यात आली.
काही दिवसांपूर्वी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील धरणांमधील पाणी प्रश्न पेटला होता. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यावर स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, परंतु [प्रश्न कायमचा सुटावा यासाठी काही केल्याचे ऐकावीत नाही. त्यामुळे मनसेने त्यांच्या सत्ताकाळात जन्म दिलेली ही पाणीपुरवठा योजना पुढील अनेक वर्ष नक्कीच वरदान ठरणार हे निश्चित आहे.
VIDEO: अशी सुरुवात झाली होती या योजनेची मनसेच्या काळात;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं