मुंबई महापालिकाच्या शाळेत औषधातून १४० विद्यार्थ्यांना विषबाधा तर एका विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई : गोवंडीमधील एका महापालिका शाळेतील १४० विद्यार्थ्यांना औषधातूनच विषबाधा झाली आहे. त्यात दुर्दैवाने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून हे औषध देण्यात येत. गोवंडी येथील संजय नगर मध्ये एक उर्दू माध्यमाची शाळा आहे तिथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
या उर्दू महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कॅल्शियम आणि रक्तवाढीची औषधं दिली जात होती. त्यांना ६ ऑगस्ट रोजी ही औषधं दिली होती. या औषधांमुळेच ती रिअॅक्शन झाल्याचं तज्ज्ञ बोलत आहेत. यात उपचारादरम्यान चाँदनी शेख हीचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळं पालकांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण असून महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नगरसेवक रईस शेख यांनी ही विषबाधा नक्की खिचडी खाल्ल्यामुळे झाली आहे की खिचडी खाल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांमुळ याची चौकशी करण्यात यावी असं म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं