हतबल शिक्षक अखेर न्यायासाठी राज ठाकरेंच्या दरबारी, घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : रहेजा कॉलेजमधील कला विषयाचा शिक्षक असलेल्या हा तरुण, रहेजा कॉलेज प्रशासनाने बंद केलेला कला विभाग पुन्हा सुरु करण्यासाठी मागील ४ वर्षांपासून एकाकी लढा देत होता. कॉलेज प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रार करुन सुद्धा ढिम्म प्रशासन काहीच हालचाल करत नसल्याची या तरुणाचं तक्रार आहे.
सर्व अपेक्षा संपल्याने कलेची खरी जाण राज ठाकरे यांना असल्याने, ते माझ्या लढ्याला समजून घेतील आणि त्यांच्या मार्फत माझ्या ४ वर्षांपासूनच्या लढ्याला आवाज मिळेल या दृष्टिकोनातून त्यांने स्वतःच्या लढ्याचं गांभीर्य व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन, त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याचं त्याने लिहिलेल्या एका पत्रात म्हटलं आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे हा तरुण शिक्षक, आज दुपारी बाराच्या सुमारास राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवास्थाना बाहेर पोहोचला व विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कृष्णकुंज बाहेरील उपस्थित सुरक्षा रक्षकांनी आणि राज ठाकरेंच्या कुटुंबीयांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु झटापटीत त्याला रोखण्याचा प्रयत्न असफल ठरला आणि त्यांने अखेर विष प्राशन केलं. कृष्णकुंजवरील उपस्थितांनी त्या शिक्षकाला तातडीने उपचारांसाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं