भाजपचे चौकीदार मंगेश सांगळेंकडून १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग, गंभीर गुन्हा दाखल

नवी मुंबई : माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या विरोधात नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा गंभीर असल्याने अटक होण्याच्या भीतीने मंगेश सांगळे हे बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मंगेश सांगळे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर विक्रोळीतून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ मधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेमधून भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला होता. ऐरोलीत राहणारे एक कुटुंब मंगेळ सांगळे यांच्या परिचयाचे आहे. परिचयाच्या संबंधित कुटुंबातील १९ वर्षांच्या तरुणीने मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्याने खळबळ माजली आहे.
संबंधित तरुणीने मंगेश सांगळे यांनी कारमध्ये तरुणीसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच सोबत कोणीही नसल्याचे पाहून मंगेश सांगळे यांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा किळसवाणा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधित पीडित तरुणीने केला आहे. त्यानंतर बिथरलेल्या तरुणीने मला ताबडतोब घरी सोडा अन्यथा मी आरडाओरडा करेन अशी धमकी दिल्यानंतर मंगेश सांगळे यांनी मला घरी सोडले आणि तिथूनच पळ काढला असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. सदर घटना ऑक्टोबर २०१८ मध्ये ही घटना घडली होती. याच महिन्यात तरुणीची सहामाही परीक्षाही होती.
परंतु, सांगळेसोबतचे कौटुंबिक संबंध पाहता आणि भीतीपोटी पीडितेने सुरुवातीला आई-वडिलांना याबाबत माहिती दिली नाही. परंतु, पालकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी मुलीशी संवाद साधला आणि तिला बोलते केले. मुलीने माहिती देताच त्यांनी रबाळे पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला. सध्या सांगळे बेपत्ता असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ सुधाकर पाठारे यांनी दिली. या प्रकरणी मंगेश सांगळे यांच्या वतीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं