स्वाभिमानी शेतकरी संघटने पुण्यात दुधाच्या ५ गाड्या फोडल्या, मुंबईत ‘दूध-कोंडी’

मुंबई : राज्य सरकारनेही दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर ५ रुपये दर द्यावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ५ दुधाच्या ५ गाड्या फोडल्याची बातमी आहे. त्यामुळे हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या धर्तीवर हा भाव द्यावा अशी तीव्र मागणी केली जात आहे. आज सकाळी विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलनाला सुरूवात केली आहे. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला गोकूळनेही जाहीर पाठिंबा देत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील दूध संकलन बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. आंदोलकांच्या मागण्यांवर जोपर्यंत महाराष्ट्र सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये दुधाचा तुटवडा जाणवू शकतो असं म्हटलं जात आहे.
राज्य सरकारने हे आंदोलन मोडून काढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या धरपकड सुरु केल्या आहेत. दरम्यान दुधाला दरवाढ देण्यात आली असून दूध संघांनी त्याप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले. परंतु त्यानंतर सुद्धा आंदोलन होणार असेल, तर रासप’चे कार्यकर्ते सुद्धा मैदानात उतरतील, असा सूचक इशारा पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिला आहे. परंतु मुंबईला दुधाची कमतरता भासणार नाही, असाही निर्वाळा सरकारकडून देण्यात आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं