पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईंचाच सल्ला घेणार, शिवसेनेच्या मुंबई पालिकेचा घाट

मुंबई : सीएसटीएम स्थानकाजवळील हिमालय पुलाचा भाग कोसळण्यास जबाबदार ठरलेल्या बेजबाबदार कंत्राटदारावर पालिका प्रशासनाने १६ पुलांच्या दुरुस्तीची जबाबदारी टाकली आहे. हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाई असोसिएटेड या कंपनीला पुन्हा काम देण्याचा घाट पालिका प्रशासनाने घेतला आहे. या दुरुस्तीसाठी पालिका तेरा कोटी ८६ लाख मोजणार आहे. पालिका प्रशासनाच्या या आश्चर्यकारक निर्णयामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या जीव धोक्यात येणार आहे.
१४ मार्च रोजी हिमालय पुलाचा भाग कोसळून एकूण ६ निर्दोष मुंबईकरांचा मृत्यू तर तब्बल ३१ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. हिमालय पूल कोसळून झालेली दुर्घटना बनावट स्ट्रक्चरल ऑडिटमुळेच घडल्याचा ठपका ठेवत मुंबई महापालिकेने कंत्राटदारावर कारवाई केली. भक्कम पुराव्याच्या आधारे कंपनीचा ऑडिटर निरजकुमार देसाई याला दोषी ठरवून पोलिसांनी अटक केली. चुकीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमुळे हिमालय पूल दुर्घटना घडल्याचे समोर आल्यानंतर मुंबईतील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी दोषी ठरलेल्या देसाईज असोसिएटेड कंपनीला काळ्या यादीत व पॅनलवरून हकालपट्टीही करण्यात आली. असे असताना पालिकेने एबीसीडी आणि ई विभागातील पुलांची व भुयारी मार्गाची किरकोळ दुरुस्तीसाठी डी. डी. देसाईचा सल्ला घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा या वर्दळीच्या भागातील १६ पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी १३ कोटी ८६ लाख, ४० हजार ८९ रुपये खर्च केला जाणार आहे. हिमालय पूल दुर्घटनेनंतर देसाईने केलेल्या इतर पुलांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. असे असताना मुंबईतील पुलांच्या व भुयारी मार्गाच्या दुरुस्तीसाठीचा सल्ला पुन्हा डी. डी. देसाईचा घेतला जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं