मनसेचे नितीन नांदगावकरांच्या तडिपारीमागे आकृती बिल्डर?

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी आकृती बिल्डरच्या सायन प्रतीक्षा नगर येथील SRA ट्रान्झिट कॅम्पची दयनीय अवस्था आणि अपात्र ठरवण्यात आलेल्या तब्बल १३७ मराठी कुटुंबीयांचं वास्तव समोर आणलं. त्यात कहर म्हणजे या ट्रान्झिट कॅम्पमध्ये वास्तव्यास असलेल्या १३७ कुटुंबियांच्या घरातील वीज आणि पाणीपुरवठा देखील सदर बिल्डरने काढून घेतला आहे. संबंधित मराठी कुटुंबीय अपात्र आहेत किंवा नाही याचा कोणताही अधिकृत निकाल लागण्यापूर्वीच त्यांना मूलभूत सुविधांपासून दूर करून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नितीन नांदगावकर यांनी सामान्य मराठी माणसाच्या हक्कांसाठी आकृती बिल्डरला धडा शिकवण्याचा मानस केला होता.
परंतु, याच आकृती बिल्डरची अजून काही प्रकरणं बाहेर येण्याच्या भीतीने तसेच याच बिल्डरसोबत अंधेरी पूर्व येथील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाचे हितसंबंध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच नितीन नांदगावकर यांचावर दबावापोटी कारवाई केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या सूत्रांनी समजले आहे. कारण, याच आकृती बिल्डरचे मुंबई अंधेरी पूर्व येथे सर्वात मोठे मायाजाल असल्याचं वृत्त आहे. आकृती बिल्डरचा मुंबई अंधेरी पूर्व येथील गणेशपाडयात SRA प्रकल्प असून, त्यात मोठा घोटाळा झाला असल्याचे बोललं जात आहे. सदर प्रकल्पात आकृती बिल्डरने मूळ झोपड्पट्टीधारकांना घराचा ताबा न देता, भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाच्या मदतीने अनेक घुसखोरांना संबंधित प्रकल्पात भ्रष्टाचाराच्या हेतून घुसवल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आहे. तर शंकरवाडी येथे मुंबई महानगर पालिकेच्या अधिकारातील जागा आकृती बिल्डरने पालिकेतीलच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून सदर प्लॉट चुकीच्या पद्धतीने हडप केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आले आहे. या भ्रष्टाचारात अंधेरी पूर्व येथील भाजपच्या संबंधित नगरसेवकाने महत्वाची भूमिका बजावल्याचे समजते. धक्कादायक म्हणजे लोकं आकृती बिल्डरच्या कार्यालयात तगादा लावू लागण्याने बिल्डरने त्याचे कार्यालय मुंबईत इतरत्र हलवल्याचा आरोप स्थानिक लोकं करत आहेत. यात सत्ताधारी पक्षातील इतर नेते मंडळी देखील सामील असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
इतकंच नाही तर भाजपच्या या नगरसेवकावर सध्या न्यायालयात अनेक खटले देखील प्रलंबित आहेत, त्यावर देखील लवकरच निकाल अपेक्षित आहे. परंतु, आज मनसेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना आकृती बिल्डरच्या प्रकरणात हात घातल्याने गर्दुल्ले आणि अनधिकृत रिक्षाचालकांना मारहाण अशी जुनी कारणं पुढे रेटून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून सूत्र किती जोरदारपणे फिरली आहेत याचा प्रत्यय येतो. वास्तविक नितीन नांदगावकर यांनी सायन प्रतीक्षानगर येथे असे कोणतेही कृत्य केले नव्हते की त्यांना थेट तडीपारीची नोटीस देण्यात यावी. त्यामुळे सदर कारवाई मागे आकृती बिल्डरच्या अंधेरी पूर्व येथील SRA प्रकल्पांचा संबंध असल्याचं देखील बोललं जात आहे.
VIDEO: सायंन प्रतीक्षानगर येथे आकृती बिल्डरचे पितळ उघड केल्यानंतर तडीपारीची हालचाली?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं