प्लास्टिकबंदी विरोधात शिवसैनिकाची मुस्लिम वस्त्यांमध्ये अधिकाऱ्यांना दमदाटी

नांदेड : चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण खात्याने अंमलात आणलेल्या प्लास्टिकबंदी आणि त्यावरील अवाजवी दंडा विरोधात मुस्लिम वस्त्यांमध्ये आवाज उठवला खरा, परंतु नांदेडच्या पालिकेतील कर्मचाऱ्याला प्लास्टिक आढळल्यामुळे दंड आकारणाऱ्या पालिका कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी या शिवसैनिकाला नांदेड पोलिसांनी तुरुंगवारी घडवली.
नांदेड पालिकेतील पीर बुऱ्हाणनगर भागात एका किरकोळ दूध विक्रेत्याजवळ बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या. पर्यावरण मंत्र्यांनी अंमलात आणलेल्या नियमानुसार पालिकेच्या कर्मचाऱ्याने ५ हजार रुपये दंड आकारताच त्याने हा दंड अवाजवी असल्याचा स्पष्ट करत तुम्ही मुस्लिमांच्या गरीब वस्त्यांमध्ये कसे दंड वसूल करायला येता असा प्रश्न विचारत, एखादा दिवसाला १०० रुपये कमावणारा माणूस ५००० रुपयाचा दंड कसा भरेल असा प्रश्न त्या पालिका अधिकाऱ्याला विचारला.
शेख अफजल असं या शिवसैनिकच नाव असून त्याने नांदेड पालिकेतील पीर बुऱ्हाणनगर भागात स्वतःच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि समाज माध्यमांवर शेअर केला होता. त्यावर पालिका आयुक्त लहुराज माळी यांनी या प्रकारची गंभीर दखल घेत या शिवसैनिका विरोधात भाग्यनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यास सांगितल्याने त्याला प्लास्टिकबंदीला विरोध केल्याने पोलिस कोठडीत धाडले आहे.
काय आहे नक्की व्हिडिओ;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं