नारायण राणेंनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकारली

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकरली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा झाली होती.
नारायण राणेंनी भाजपची ही ऑफर स्वीकारल्याने ते सोमवारी राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचं संख्याबळ पाहता ते सहज निवडून येतील.
नारायण राणेंनी काँग्रेसच्या आमदारकीचा तसेच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी लगेचच एनडीएला समर्थन देऊन मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी भाजप कडे हालचाली सुरु केल्या होत्या. त्यानतंर भाजपने ही त्यांना बराच वेळ ताटकळत ठेवले होते.
काही दिवसांपूर्वीच दिल्लीला अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. परंतु राणेंनी विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला आणि अखेर त्यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं