अडवाणींनंतर कोण? त्यांच्या योजना काँग्रेस आणि भाजपातील वरिष्ठांविरुद्ध देखील?

नवी दिल्ली : कालच भाजपने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि त्यात पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगर लोकसभेतून उमेदवारी न देता थेट अमित शहांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत असून अडवाणी नंतर कोणाचे नंबर असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यासाठी मोदी आणि अमित शहा जोडीचे जुने फोटो देखील व्हायरल केले जात आहेत.
दरम्यान, जर पुन्हा भाजप सत्तेवर आल्यास थेट राजनाथ सिंग यांचा पत्ता कट करून त्यांची जागा आणि मंत्रालय देखील अमित शहांना देण्यात येईल अशी चर्चा सुरु झाली आहे. सुषमा स्वराज यादेखील २०१३ मध्ये पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत होत्या, परंतु त्यांना देखील केवळ ५ वर्ष परराष्ट्र व्यवहार मंत्रालय देऊन शांत करण्यात आलं. परंतु भविष्य काय आहे हे सुषमा स्वराज यांनी अचूक ओळखलं आणि अपमान होण्यापूर्वीच स्वतःच्या आजारपणाची कारणं पुढे करून मी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा मध्य प्रदेशाच्या दौऱ्यावर असताना केली होती.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून नितीन गडकरी निकालानंतर देशाचे पंतप्रधान होतील अशा बातम्या झळकत आहेत. त्यांची प्रतिमा स्वच्छ आणि कर्तृत्ववान नेते अशी असल्याने गुजरात लॉबी त्यांच्या विरुद्ध सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे २०१३ पर्यंत केंद्रात काहीच वजन नसणारे मोदी आणि अमित शहा यांचे पूर्वीचे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहेत. मोदी आणि अमित शहा यांची भाजपमधील एकूण रणनीती पाहिल्यास ते भाजपचे सर्वेसेवा बनण्याच्या दिशेने जात आहेत आणि त्याचा प्रत्यय २०१९ मधील निकाल भाजपच्या बाजूने लावल्यास काही दिवसातच येऊ शकतो.
त्यामुळे एकूणच भाजपमधील सर्व वरिष्ठ नेत्यांची फळी उध्वस्त करून गुजरातमधील अमित शहा, पियुष गोयल आणि गुजरातमधील इतर विद्यमान मंत्र्यांना केंद्रात ओढून एकछत्री कार्यक्रम राबवला जाऊ शकतो, अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. त्यामुळे पुढे अजून काय होणार ते पाहावं लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं