ट्विटरवर जगात नरेंद्र मोदींचे सर्वाधिक फेक फॉलोअर्स

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच ट्विटरने त्यांच्या एकूण अकाउंट्सच ऑडिट प्रसिद्ध केलं आहे. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ६० टक्के फॉलोअर्स हे फेक फॉलोअर्स असल्याचे समोर आले आहे. ट्विटर ने अधिकृतपणे केलेल्या या ऑडिट मध्ये फेक फॉलोअर्सचा छडा लावण्यात आला.
जगातील प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये नरेंद्र मोदींचे नाव येत असलं तरी त्यांच्या फेक फॉलोअर्सचा आकडा सर्वानाच धक्कादायक आहे. मोदींच्या एकूण ४ कोटी फॉलोअर्स पैकी ६० टक्के म्हणजे चक्क २ कोटी ४० लाख मोदी फॉलोअर्स हे फेक अकाउंट्स म्हणजे फेक फॉलोअर्स आहेत.
यादी टाईम्स मॅगझीनच्या यादीत झळकलेले नरेंद्र मोदी ट्विटरने अधिकृतपणे जाहीर केलेल्या यादीमुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात खरंच प्रसिद्ध आहेत का या बद्दल देशभरात संभ्रम निर्माण झाला आहे. फेक फॉलोअर्सच्या यादीत मोदींच्या पाठोपाठ पोप फ्रान्सिस यांचं नाव असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चौथ्या स्थानी असून त्यांच्या फेक फॉलोअर्सची टक्केवारी ही ३७ टक्के इतकी म्हणजे नरेंद्र मोदींच्या एकूण फेक फॉलोअर्सच्या जवळजवळ निम्मी आहे.
मोदींच्या कोणत्याही ट्विटला होकारात्मक प्रतिक्रिया देणे, त्यांच्या ट्विटला लाईक्स देणे अशा उद्देशानेच असे फेक अकाउंट्स बनवले जात आहेत जेणेकरून जनमानसात त्यांच्या बद्दलची प्रतिमा उंचाविण्यासाठी आणि त्याच्या बाजूने एक मतप्रवाह निर्माण करण्यासाठी असे फेक ट्विट फॉलोअर्स त्यांचे अकाउंट्स वापरतात की काय असं काहीस वातावरण निर्माण झालं आहे. अशा फेक फॉलोअर्सचा निवडणुकीच्या काळात सुळसुळाट वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ही यादी स्वतः ट्विटरनेच प्रसिद्ध केल्याने त्यांच्या चाहत्यांची चांगलीच फजिती झाली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं