गर्व आहे मोदीजी आम्हाला! सत्ता जाण्यापूर्वी अशी कबुली देणारे भारताचे पहिले पंतप्रधान तुम्हीच

पालघर : देशातील विरोधकांनी नेहमीच नरेंद्र मोदींवर देशातील महत्वाच्या मोठ्या संस्था उध्वस्थ केल्याचा आरोप केला आहे. अर्थात मोदींनी ते कधीच मान्य केलं नसलं तरी त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाने ते एका ट्वीटमध्ये मान्य केल्याचे म्हणावे लागेल. कारण याट्विटमध्ये मोदी स्वत:वरच आरोप करताना दिसत आहेत.
त्यानुसार “काँग्रेसने कलम ३५६ चा अनेक वेळा गैरवापर केला आहे. परंतु, नरेंद्र मोदींनी देशातील संस्था नष्ट केल्या: पंतप्रधान,” अशा आशयाचं ट्वीट काल संध्याकाळी पीएमओ इंडिया या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलं. त्यामुळे देशातून मोदींनी दिलेल्या या कबुलीचं कौतुक करत, त्यांना खोचक टोले लगावत विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी वेड्यात काढण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या या ट्विटवरून समाज माध्यमांवर रान पेटले आहे आणि नरेन्द्र मोदींना नेटकऱ्यांनी अक्षरशः फैलावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना मिळणाऱ्या प्रतिक्रिया थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. त्यात आता मनसेचे कार्यकर्ते सुद्धा उतरले आहेत. त्यात सर्वात खोचक प्रतिक्रिया राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी यांनी फसेबूकवरून टाकली आहे.
तुलसी जोशी यांनी पंतप्रधान कार्यालयाच ट्विट शेअर करत म्हटलं आहे, “गर्व आहे मोदीजी आम्हाला! सत्ता जाण्यापूर्वी अशी कबुली देणारे भारताचे पहिले पंतप्रधान तुम्हीच”. अगदी आमच्या राज साहेबांपासून ते देशातील सर्वच विरोधकांनी जे आरोप केले होते, ते तुम्ही स्वतःच मोठ्या मनाने सत्तेतून पायउतार होण्यास काही दिवस उरले असताना मोठ्या मनाने मान्य केले आणि पंतप्रधान कार्यालयाला आदेश देऊन तसं ट्विटरवरून देशवासियांना कळवायला सांगितलं. त्यात स्वतःच मोठ्या मनाने मान्य केलं की “नरेंद्र मोदींनी देशातील संस्था नष्ट केल्या” आणि पुढे “पंतप्रधान” असं न विसरता लिहिण्याचे आदेश सुद्धा दिले. वाह मोदीजी वाह! असा सच्चा पंतप्रधान होणे नाही.
काय पोस्ट आहे तुलसी जोशी यांची?
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं