अण्णांच्या त्यावेळच्या जन आंदोलनामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान : राज ठाकरे

राळेगणसिद्धी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. दरम्यान, अण्णांनी राज ठाकरे यांच्याशी बंद दरवाज्याआड चर्चा सुद्धा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अण्णांच्या उपोषणाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून यापुढे कुठली गोष्ट करु नका, असे त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जमलेल्या उपस्थितांनसमोर आवाहन केले. अण्णांच्या त्यावेळच्या जण आंदोलनामुळेच मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. परंतु आता त्यांना अण्णांचा आणि त्यांच्या प्रलंबित मागण्याचा पूर्ण विसर पडल्याचे राज ठाकरे म्हणाले. खरंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आज इथे यायला पाहिजे होतं असे सुद्धा राज ठाकरे म्हणाले.
त्यानंतर बोलताना एका घटनेची आठवण करून देताना राज ठाकरे म्हणाले की, १८ डिसेंबर २०१३ रोजी नरेंद्र मोदी यांनी टि्वट केले होते. लोकपालची नियुक्ती झाली पाहिजे. आज सत्ता येऊन ५ वर्ष पूर्ण झाली. लोकपालची नियुक्ती का नाही झाली ? असा प्रश्न त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तसेच उपोषण करताना जीवावर बेतेल अस काही करु नका, असा आपुलकीचा सल्ला सुद्धा त्यांनी अण्णांना भेटीदरम्यान दिला.
आपण सर्व एकत्र येऊ यांना गाडून टाकू असेही राज यांनी अण्णांना आवाहन केले. आज अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा सलग ६वा दिवस आहे. लोकपाल, लोकायुक्तासह अन्य मागण्यांसाठी अण्णा उपोषणाला बसले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं