नरसय्या आडम पलटले; मी २०२२ मध्ये केवळ पंतप्रधान असं म्हणालो, पंतप्रधान मोदी असं नाही म्हणालो

सोलापूर : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी व्यासपीठावरून भाषणादरम्यान माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांनी मोदींची तोंडभरून स्थुती केली. परंतु, कार्यक्रम आटोपून मोदींनी सोलापूरच्या हद्दीबाहेर जाताच त्यांनी आपल्या भाषणातील त्या वाक्याचा पूर्ण खुलासा केला आणि पुढचे पंतप्रधान मोदी नव्हे असे सूचक संकेत दिले आहेत.
भाषणादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना नरसय्या आडम म्हणाले होते की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापुरात उभारत असलेल्या ३० हजार घरांच्या वसाहतीची पायाभरणी आज झाली आहे. परंतु, तो पूर्णत्वाला गेल्यावर म्हणजे २०२२ मध्ये सुद्धा पंतप्रधानच त्याचे लोकार्पण करतील असे भाष्य केले होते. दरम्यान, मोदींच्या कार्यक्रमाची सांगता झाल्यावर प्रसार माध्यमांनी त्यांना विचारले की २०२२ मध्ये मोदीच पंतप्रधान असतील असे भाष्य तुम्ही केले आहे.
त्यावर नरसय्या आडम यांनी स्वतःच्या वाक्याची माध्यमांना आठवण करून देताना म्हटलं की, मी २०२२ मध्ये केवळ पंतप्रधान असं म्हणालो, पंतप्रधान मोदी असा उल्लेख नाही केला याची आठवण प्रसार माध्यमांना करून दिली. सोलापूर येथे एबीपी माझाच्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं आणि सूचक इशारा देत, पुढील पंतप्रधान मोदीच असतील असं नाही, असे म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं