एनसीपीच्या भारती पवार आणि काँग्रेसचे प्रविण छेडा भाजपात, लोकसभेची उमेदवारी मिळणार?

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. भारती पवार आणि मुंबईतील काँग्रेसचे नेते प्रविण छेडा यांनी आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भारती पवार व छेडा यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा झेंडा हातात देऊन स्वागत केले. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तर प्रविण छेडा हे ईशान्य मुंबईतून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. या दोघांना लोकसभेची उमेदवारी मिळणार हे आता निश्चित मानले जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉ. भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक होत्या. मात्र, राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले नाही. ज्येष्ठ आदिवासी नेते व दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार हे नेहमीच शरद पवारांसोबत राहिले. मात्र, एटी पवार यांच्या निधनानंतर कुटुंबात कौटुंबिक वाद सुरू झाले. भारती पवार आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार या जावा- जावातून सध्या विस्तवही जात नाही. या कौटुंबिक वादाचा पक्षाला नुकसान होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने पवार यांच्याऐवजी दुस-या उमेदवाराचा शोध घेतला. अखेर राष्ट्रवादीने दिंडोरीचे माजी आमदार व शिवसेनेचे नेते धनराज महाले यांना लोकसभेची उमेदवारी दिली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं