मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव: शरद पवार

नवी दिल्ली : मराठा समाजच्या आंदोलकांनी हिंसा तसेच जाळपोळीचे प्रकार थांबवून शांततेने आंदोलन करण्याला प्राधान्य द्यावे आणि मराठा व बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव हाणून पडावा असं आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केलं आहे.
मराठा आंदोलनाला बदनाम करून राज्यकर्त्यांचा मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. शरद पवारांनी अधीकृत पत्रक काढून मराठा समाजाला हे आवाहन केलं आहे. मराठा आंदोलनाला बहुजन समाजाचा सुद्धा पाठिंबा मिळाला असून त्याला जरा सुद्धा धक्का लागेल असा प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी असं पवारांनी प्रसिद्ध केलेल्या या पत्रात म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. महाराजांच्या त्या आदर्शाला धक्का बसेल असं आंदोलन करू नका असं विनंती वजा आवाहन केलं आहे. तसेच आरक्षणाबद्दल बोलताना म्हटलं आहे की आरक्षणाची प्रक्रिया हि संविधनाशी संबंधित असल्याने, त्यासाठी वेळ द्यावा लागेल असं म्हटलं आहे. त्या व्यतिरिक्त राज्यात असलेल्या उद्योगांमधील गुंतवणूक थांबेल आणि बेरोजगारीचा प्रश्न बिकट होईल असं हिंसक आंदोलन करू नका असं पत्रकात म्हटलं आहे.
तसेच गोखले अर्थ राज्यशास्त्र संस्थेच्या शेतकरी आत्महत्येच्या संदर्भातील अहवालाचा हवाला देताना त्यांनी म्हटलं आहे की, शेतजमिनीचे छोटे छोटे तुकडे पडत गेल्याने मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बेताची होत गेली. तसेच मराठा समाजातील २८ टक्के कुटुंब भूमिहीन आहेत आणि समाजातील आत्महत्येचं प्रमाण ४६ टक्के इतकं आहे आणि त्यामुळेच मराठा समाजात प्रचंड असंतोष खदखदत आहे असं पत्रकात नमूद केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही. परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. हिंसा, जाळपोळ, दंगे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सक्तीने टाळले गेले पाहिजे. pic.twitter.com/WhNnFSLGpB
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 11, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं