ख्रिस्ती धर्मीयांबाबत वादग्रस्त विधान, भाजप नेत्यांना शरम वाटली पाहिजे: शरद पवार

पुणे : मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपवर चारही बाजूने टीकेचा भडीमार होत असताना, आता राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी सुद्धा भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप नेत्यांना शरम वाटली पाहिजे,’ अशा तिखट शब्दात शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात कोणी काय खावे आणि कोणते कपडे घालावेत अशा मुद्द्यांवरून देशातील वातावरण खराब करण्यात येत असल्याचा आरोप पवारांनी भाजपवर केला आहे. त्यात काल भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांबाबत केलेली विधाने सुद्धा निंदनीय आहेत असं पवार म्हणाले.
संबंधित विषयावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले की,’ स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेसची स्थापना झाली असून, त्यामध्ये अॅनी बेझंट यांचे देशासाठी महत्वाचे योगदान होते. त्यामुळे अशी विधाने करताना भाजपच्या त्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे, अशी जळजळीत टीका शरद पवार यांनी केली. एनसीपी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ईद मिलन कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, अब्दुल गफार अब्दुल रज्जाक, चेतन तुपे, पी. ए. इनामदार आदी उपस्थित होते.
तसेच आज ख्रिस्ती, शीख, मुस्लिम धर्मियांविरुद्ध खुलेआम काही सुद्धा बोलले जाते आहे. परंतु समाजातील सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा विचार मांडणाऱ्या हिंदू धर्मीयांविरुद्धही बोलणाऱ्या शक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे असं पवार उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं