राष्ट्रवादीच्या औरंगाबाद मधील हल्लाबोल सभेला अखेर परवानगी.

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसेवा शरद पवार यांच्या औरंगाबाद मधील हल्लाबोल सभेला अखेर काल रात्री उशिरा पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या आज होणाऱ्या सभेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
थेट मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सभेला मंजुरी नसल्याने आधी औरंगाबाद महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काल पासून राष्ट्रवादी पक्षाची धावपळ सुरु होती. परंतु अखेर काल रात्री उशिरा पोलिसांनी परवानगी दिली असल्याने हल्लाबोल सभेला परवानगी मिळाली आहे.
राष्ट्रवादी पक्षाने संपूर्ण मराठवाड्यात भाजप – शिवसेना सरकारविरोधात हल्लाबोल यात्रा सुरु केली होती, ज्याची सांगता आज औरंगाबाद मध्ये शरद पवार यांच्या सभेने होणार आहे. सकाळी क्रांतिचौक पासून ते मराठवाडा विभागीय आयुक्त असा हा मोर्चा कडून, नंतर विभागीय आयुक्तांना पक्षातर्फे एक निवेदन दिल्या नंतर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक सभा आयोजित करून मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेची सांगता होणार आहे.
राष्ट्रवादीचे प्रमुख नेते म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जयंत पाटील, चित्रा वाघ हे सर्व या सभेसाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.
मराठवाड्यातील #HallaBol च्या सांगता सभेआधी #औरंगाबाद येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभतोय. सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात एकत्र आलेला हा जनसमुदाय आहे. या निद्रिस्त सरकारला जागे केल्याशिवाय आता हा शांत होणार नाही. pic.twitter.com/d9ra5ecIsM
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 3, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं