छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राजनाथ सिंह यांच्यावर सर्वच थरातून जोरदार टीका

मुंबई, २८ ऑगस्ट | छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पुण्यात केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या वक्तव्याचा निषेध करत राजनाथ सिंहांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर राजनाथ सिंह यांच्यावर सर्वच थरातून टीका – NCP MP Amol Kolhe comment on Defence minister comment on Chhatrapati Shivaji Maharaj :
‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे. जर ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते.’, असे मत खासदार डॉ. कोल्हे यांनी मांडले आहे.
संरक्षणमंत्र्यांचा दावा:
राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळातून शिक्षण दिल्यानेच शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घडतानाच, राष्ट्रनायक झाले. आपण महाराष्ट्रातच आहोत, ज्याठिकाणी एका खेळाने एका मुलाला राष्ट्रनायक म्हणून घडवले, असे वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: NCP MP Amol Kolhe comment on Defence minister comment on Chhatrapati Shivaji Maharaj.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं