आज राष्ट्रवादीच्याच व्यासपीठावर भुजबळांची तोफ धडाडणार

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ जवळजवळ दोन वर्षानंतर जामिनावर बाहेर आल्यावर ते नक्की काय भूमिका घेणार किंव्हा राष्ट्रवादीतच राहणार की दुसरा विचार करणार असे एक ना अनेक राजकीय तर्क राजकीय विश्लेषक लढवत होते. त्या तर्कवितर्कांना अखेर स्वतः छगन भुजबळ यांनीच उत्तर दिल आहे.
छगन भुजबळ त्यांची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की, मी माझी भूमिका राष्ट्रवादीच्याच व्यासपीठावरूनच मांडणार आहे. तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे भुजबळ नक्की काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाची नजर असणार आहे.
गेले दोन महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसरकार विरोधात हल्लाबोल यात्रा सुरु आहे. आज या हल्लाबोल यात्रेचा समारोप पुण्यात होत असल्याने तिथे स्वतः छगन भूजबळ संबोधित करणार आहेत. कालच त्यांनी महात्मा फुले वाड्याला भेट दिली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, मला भेटण्यासाठी विविध पक्षांचे नेते आपुलकीने येऊन भेटून गेले त्यांचा मी आभारी आहे. मात्र ते सर्व भेटल्याने वेगवेगळे तर्क लढविले गेले. इतकंच नाही तर मी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाणार की नाही असं सुद्धा प्रसिद्ध होत आहे. परंतु मी माझी ठाम भूमिका हि राष्ट्रवादीच्याच व्यासपीठावर मांडणार आहे असं भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या आजच्या पुण्यातील हल्लाबोल यात्रेतील समारोपाच्या कार्यक्रमात भुजबळ नक्की काय बोलणार याकडे सर्वाचेच लक्ष लागून राहिले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं