राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांसमोरच एकमेकांना भिडले

फलटण : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केलेली असताना, माढा मतदार संघात येणाऱ्या फलटण तालुक्यात एनसीपीमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. दरम्यान, आज स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दौऱ्यावर आले असताना त्यांच्यासमोरच शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड वादावादी झाली. कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यावरून सुरू झालेल्या या वादामुळे कार्यक्रमात गोंधळ आणि तुफान घोषणाबाजी सुरू झाली, त्यामुळे पवारांना देखील आपले भाषण काहीवेळ थांबवावे लागले.
एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आज ते या मतदारसंघात येणाऱ्या फलटण येथे आले होते. त्यावेळी जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. कविता म्हेत्रे यांना स्टेजवर स्थान देण्यात आल्याने शेखर गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी घोषणाबाजीस सुरुवात केली. दरम्यान, शेखर गोरे स्टेजवर आले नाहीत.
शरद पवार हे भाषणास उभे राहिल्यानंतर गोंधळ अधिकच वाढला. त्यामुळे त्यांना आपले भाषण थांबवावे लागले. या प्रकारामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी माझा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेससमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं