नेटकऱ्यांचे प्रश्न: 'मतदारांनी खरे धाडस दाखवले', पण तुम्ही सत्तेला लाथ मारण्याचं धाडस कधी दाखवणार?

मुंबई : ४ राज्यांमधील मतदारांनी आगामी निवडणुकीत पर्याय कोण? याचा जराही विचार न करता जे नकोत त्यांना थेट नाकारले आहे. आणि त्यांना उखडून फेकले आहे. त्यामुळे असे धाडस दाखवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराम या सर्व राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. आणि अंतिम निकालाअंती काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले असलेले छत्तीसगड, राजस्थानात आणि मध्य प्रदेश बहुमताने उध्वस्त केले आहेत. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपाला चिमटा काढला आहे.
पुढे ते असे म्हणाले की,’निवडणुकीत हार-जीत तर होत असते’. जो जिंकतो त्याचे सुद्धा अभिनंदन होतेच, पण ४ राज्यांत बदल घडवणाऱ्या निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी EVM, पैसावाटप, गुंडागर्दी याविषयांपेक्षा ‘पर्याय कोण’?, अशा विषयात गुंतून न राहता, जे नकोत त्यांना सर्वात आधी नाकारले आहे. सरळ उखडून फेकले आहे. आणि पुढचे पुढे काय ते पाहू, असा पवित्रा या राज्यांमधील मतदाराने घेतला. त्यांउळे यालाच मी खरे धाडस म्हणेन अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी नोंदवली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मतदाराच्या धाडसाचे कौतुक केले असले तरी, नेटकऱ्यांनी उलट त्यांच्यावरच प्रश्नांचा भडीमार केल्याचे दिसत आहे. त्यात अनेकांनी प्रतिक्रया देताना म्हटले आहे की, ‘मतदाराने धाडस दाखवले, तुम्ही सत्तेला लाथ मारायचं धाडस कधी दाखवणार’…..तसेच अनेकांनी म्हटले आहे की, ‘जर त्यांना जनतेने नाकारले आहे, तर तुम्ही नाकारलेल्यांसोबत सत्तेत काय करत आहात?’ असा प्रश्न केला आहे…… तर अनेकांनी तुम्ही त्यांचे सत्तेतील मित्र आहात, त्यामुळे तुमचा नंबर सुद्धा लवकरच येईल असे म्हटले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं