२०१९ मध्ये कोण पंतप्रधान असेल ते सांगता येत नाही : रामदेव बाबा

मदुराई : योगगुरु रामदेव बाबा यांनी प्रसार माध्यमांसमोर केलेल्या एका वक्तव्याने आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच खळबळ माजली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नक्की पुढील पंतप्रधान कोण होतील असा प्रश्न बाबा रामदेव यांना विचारला असता त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर सर्वच आश्चर्य चकीत झाले आहेत.
काल ते मदुराईला एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना बाबा रामदेव म्हणाले की, यावेळी ते म्हणाले की, ‘भारत हा जातीयवादी देश नाही आणि केवळ हिंदुंचा सुद्धा देश नाही. देशातील राजकीय परिस्थिती अत्यंत खडतर बनली असून पुढचे पंतप्रधान कोण असतील याबाबत सध्या काहीच सांगू शकत नाही. मी राजकारणावर लक्ष केंद्रीत केलेले नाही आणि कोणाला पाठिंबाही किंवा विरोधही केलेला नाही.
आधीच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बॅकफूटवर गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अडचणी अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यात मोदी सरकारमधील जवळपास सर्वच घटकपक्षच नाराज असल्याने बाबा रामदेव यांच्या याविधानाने त्यांना बळ मिळण्याची शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं