ना भेट, ना शब्द, उद्धव ठाकरे किती असंवेदनशील आहेत ते आज मुंबईकरांनी पाहिलं

मुंबई : मुंबई महापालिका ते दिल्लीत खुर्च्या उबवणाऱ्या शिवसेना नेत्यांची तसेच उद्धव ठाकरे यांची मुंबई शहर आणि मुंबईकरांप्रती असलेली असंवेदनशीलता आज अधोरेखित झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल येथील पादचारी पूल काल रात्री कोसळून अनेकजण मृत्युमुखी पडले आणि जखमी देखील झाले. परंतु, मुंबई महापालिकेत सत्तेत असून देखील उद्धव ठाकरे यांनी चकार शब्द देखील काढला नाही, ना जागेची पाहणी केली, ना मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, ना जखमी झालेल्यांची विचारपूस केली.
मुंबईमध्ये राहणाऱ्या उद्धव ठाकरेंकडे त्यासाठी वेळ नसला तरी ते स्वबळावर अमरावतीला जाऊन भाजप-सेनेच्या एकत्र युती मेळाव्यात मोठं मोठी फुसकी भाषणबाजी करून आले. मुंबई महापालिकेत मलिदा मिळण्याचं साधन असलेल्या स्थायी समितीतील नियुक्त्यांच्या वेळी उद्धव ठाकरे जसे जागृत दिसतात, तसे कालच्या दुर्घटनेनंतर दिसले नाहीत. मुंबई शहरात वेगळ्याच गंभीर समस्या उद्भवलेल्या असताना उद्धव ठाकरे मात्र अमरावतीत तेच नेहमीचं हिंदू, भगवा आणि लोकांसाठी युती केल्याची फुसकी आणि कंटाळवाणी भाषणं ठोकत होते.
उद्धव ठाकरे सध्या लोकसभेच्या जागा आणि वाटण्या यामध्ये इतके बुडाले आहेत कि सध्या त्यांना काहीच दिसत नाही किंवा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकरण सत्ताधारी शिवसेनेवर शेकू नये म्हणून आंधळे पानाचं नाटक करत आहेत, असंच म्हणावं लागेल. ५ वर्ष भाजप विरुद्ध रटाळ आणि फुसकी भाषणबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरेंची सध्या लोकसभेच्या निमित्ताने आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजपसोबत सुरु झालेली साखर पेरणी त्यांची विश्वासाहर्ता संपुष्टात आणत आहे याच त्यांना अजिबात भान नसल्याचं सध्याचं वातावरण सांगत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं