सावित्रीबाई फुले विद्यापीठ; पदवीदान समारंभात ‘पगडी’वरून गोंधळ

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात पगडीवरून प्रचंड तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पदवी प्रदान समारंभातील पुणेरी पगडीला उपस्थित विद्यार्थी संघटनांनी मोठा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कारण, विद्यापीठाच्या आजच्या पूर्वनियोजित पदवी प्रदान कार्यक्रमाचा ड्रेसकोड बदलून त्यात पेशवाईच्या काळातील ड्रेसकोड जाणीवपूर्वक आणण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करीत विद्यार्थी संघटनांकडून समारंभात मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली.
यावर्षीपासून विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात काळ्या गाऊन ऐवजी ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे असा ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये राजकरण असल्याचा आरोप करत या बदलला लोकतांत्रिक जनता दल, एनएसयुआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांकडून मोठा विरोध करत निदर्शनं केली असं समजतं. कुलगुरू डॉ. नितीन करमलकर यांच्या विरोधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी करीत विद्यार्थी सभामंडपात शिरले आणि निर्णयाला तीव्र विरोध करू लागले. सभागृहात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं