नारायण राणे पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध प्रचारात

पालघर : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपसाठी प्रचारात उतणार असल्याचे वृत्त आहे. पालघर मध्ये मोठया प्रमाणावर कोकणी मतदार तसेच भंडारी समाजाचे लोक आहेत. त्याचाच फायदा भाजपच्या उमेदवाराला व्हावा या उद्देशानेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना प्रचारासाठी विनंती केली आहे.
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. नारायण राणे यांना शिवसेनेच्या निवडणूक तंत्राचा चांगलाच अनुभव आहे. त्यात ते तिथकेच आक्रमक नेते म्हणून सुद्धा परिचित आहेत. ज्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होऊ शकतो.
भाजपने सुद्धा आयत्यावेळी काँग्रेसमधून उमेदवार करून त्यांना थेट पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली आहे. पालघर मतदारसंघात आगरी, आदिवासी आणि भंडारी समाजाची मत महत्वाची भूमिका बजावतात. राणेंना थेट पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात प्रचाराला उतरवून भाजपने नवी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं