पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला राष्ट्रवादीकडून धक्का, आझम पानसरेंच्या पुत्राचा राष्ट्रवादीत प्रवेश

पिंपरी : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या आणि सर्वच पक्षांमध्ये दल बदल सुरु झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सपाटा सुरू असताना पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. भाजपाचे जेष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी एनसीपी’मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
भोसरीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निहाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली भोसरीत झालेल्या युवक मेळाव्यात निहाल यांना शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्षपद बहाल करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मंगलदास बांदल, वसंत लोंढे, जगदीश शेट्टी, अजित गव्हाणे उपस्थित होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं