मोदीजी लोकांना मूर्ख समजणे बंद करा: प्रियंका गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पलटवार केला आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मूर्ख समजणे बंद करावे, मागील ५ वर्षांमध्ये मोदी सरकारने भारतातील घटनात्मक संस्थांवर हल्ला केला, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘संस्थात्मक आदर आणि संस्थात्मक द्वेष, दोन विभिन्न दृष्टीकोन’ या मथळ्याखाली ब्लॉग लिहिला आहे. दरम्यान, २०१४ च्या उन्हाळ्यात लोकांनी घराणेशाहीला नाकारून लोकशाहीला निवडलं होतं. प्रसार माध्यमांपासून संसदेपर्यंत, जवानांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत, संविधानापासून कोर्टापर्यंत काहीही काँग्रेसच्या राजकारणापासून सुटलेले नाही, या घटनात्मक संस्थांचा अपमान करणे ही काँग्रेसची पद्धत आहे, असे नरेंद्र मोदींनी या ब्लॉगमध्ये म्हटले होते.
मोदींच्या या ब्लॉगवर प्रियंका गांधी यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. “जितकी आमच्यावर टीका करणार, तितके आम्ही आणखी भक्कम होऊ. आम्ही कोणालाही घाबरत नाही”, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेला मूर्ख समजणे बंद करावे, गेल्या ५ वर्षांत मोदी सरकारने देशाच्या प्रत्येक घटनात्मक संस्थेवर हल्ला केला, असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं