दिल्लीत मोर्चेकरी शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, पण देसींगर्लच्या रिसेप्शनला मोदींची हजेरी

नवी दिल्ली : प्रसिद्ध बॉलिवूडची अभिनेत्री आणि ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनास २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्याआधी ते शनिवारी, १ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले. त्यानंतर पुन्हा रविवारी २ डिसेंबरला पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला होता. दरम्यान काल मंगळवारी दिल्लीतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये प्रियांका-निकचं ग्रँड रिसेप्शन पार पडलं.
या ग्रँड रिसेप्शनसाठी प्रियांकाच्या कुटुंबातील सर्व सदस्य मंडळी आणि मित्र परिवार असे अनेक सेलिब्रेटी आणि व्हीआयपी व्यक्तींना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा निमंत्रित करण्यात आले होते. नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावून हास्य विनोद केल्याचे दिसत आहे. परंतु, दुःखाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी बिकट परिस्थितीशी लढणारा बळीराजा दिल्लीत भव्य मोर्चा घेऊन आला होता. डोळयात अश्रू आणि अनेक मागण्या घेऊन दिल्लीत हाकेच्या अंतरावर आलेल्या शेतकऱ्यांना भेटून आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यास अजिबात वेळ नव्हता.
परंतु व्हीआयपी आणि सेलिब्रिटींचे निमंत्रण ते कधीच नाकारत नाहीत हा इतिहास आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर मोदींच्या या व्हीआयपी हजेरीवर जोरदार टीका होताना दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं