'चाय संपली' आता 'चौकीदार से चर्चा', मोदी साधणार २५ लाख चौकीदारांशी संवाद

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील तब्बल पंचवीस लाख चौकीदारांशी चर्चा म्हणजे संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ४:३० वाजता मोदी ऑडिओच्या माध्यमातून चौकीदारांशी संवाद साधतील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ‘मैं भी चौकीदार’ कॅम्पेन सुरू केलं आहे. होळीच्या पूर्वसंध्येला मोदी चौकीदारांशी साधत असलेला संवाद याच कॅम्पेनचा भाग असेल, अशी माहिती भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आली आहे.
मोदी होळीचा आनंद देशभरातील चौकीदारांसोबत साजरा करतील, असं भारतीय जनता पक्षाचे माध्यम संपर्क प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार अनिल बलुनी यांनी सांगितलं. यानंतर ३१ मार्चला मोदी देशभरातील तब्बल पाचशे ठिकाणच्या लोकांशी संवाद साधतील. भाजपाच्या मै भी चौकीदार मोहिमेत सहभागी झालेल्या लोकांना मोदी संबोधित करणार आहेत. मोदींनी ट्विटरवर सुरू केलेल्या मै भी चौकीदार मोहिमेत समाजाच्या सर्वच स्तरातील भरभरुन प्रतिसाद दिल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे.
मोदींनी शनिवारी ट्विटरवर मै भी चौकीदार कॅम्पेन सुरू केलं. मोदींनी सुरू केलेल्या कॅम्पेनला जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती भाजपानं दिली. आतापर्यंत एकूण वीस लाख लोकांनी ट्विटरवर #MainBhiChowkidarचा वापर केल्याचा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे. समाज माध्यम आणि नमो ऍपच्या माध्यमातून एक कोटी लोक या कॅम्पेनमध्ये सहभागी झाल्याची माहिती पक्षानं दिली. ‘मोदींनी सुरू केलेल्या मोहिमेचं रुपांतर आता लोकांच्या चळवळीत झालं आहे. यामध्ये समाजाच्या सर्वच स्तरातील लोक अगदी उत्साहानं आणि आनंदानं सहभागी होत आहेत,’ असं भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं