चर्चांना उधाण, कृष्णकुंजवर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि राज ठाकरेंची भेट

मुंबई : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटी मागे सदिच्छा भेट असल्याचे कारण देण्यात असले तरी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने काही चाचपणी सुद्धा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येते.
आमदार बच्चू कडू हे ग्रामीण महाराष्ट्रातील आक्रमक नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत. आगामी निवडणुकीत आमदार बच्चू कडू हे महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवेंना थेट आवाहन देण्याच्या तयारीत आहेत.
आगामी निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष वेगवेगळ्या राजकीय चाचपण्या करू शकतात आणि त्याचाच हा एक भाग असावा असं म्हटलं जात. राज ठाकरे आणि बच्चू कडू हे आक्रमक राजकीय नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित असून, आमदार बच्चू कडू हे ग्रामीण भागात सामान्य शेतकऱ्यांचा चेहरा म्हणून परिचित आहेत. भविष्यात जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना अशी आक्रमक पक्षांची युती अस्तित्वात आल्यास राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघू शकत असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं