निवडणुकीच्या खेळीत, मोदींची थेट छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेबांशी तुलना? सविस्तर

देहरादून : काही दिवसांपूर्वी ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान योगी आदित्यनाथांनी मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. काल म्हणजे अगदी निवडणुकीच्या तोंडावर आणि आरक्षणाच्या अनुषंगाने पुन्हा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी ‘आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना १० टक्के आरक्षण देणाऱ्या मोदींची २१ व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी केली आहे.
दरम्यान या ऐतिहासिक निर्णयामुळे मोदींचे खूप आभार मानत ‘सबका साथ, सबका विकास’ या आपल्या ब्रीदवाक्याला जागले आहेत, असेही रावत यांनी म्हटलं आहे. तसेच मोदी हे गरीब कुटुंबातील आहेत. त्यामुळेच ते गरीबांचे दुःख जाणतात. त्याच जाणीवेतून त्यांनी १० टक्के आरक्षणाचा मोठा निर्णय घेतला’ असे रावत यांनी विधान केलं आहे.
तसेच आर्थिक स्थितीवर आधारित आरक्षणाची मागणी सवर्णांकडून मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. या महत्वपूर्ण निर्णयामुळे संपूर्ण वर्गाला यामुळे प्रचंड फायदाच होणार आहे, असा थेट दावाही त्यांनी केला. दुसरी बाजू अशी आहे कि ज्या आरक्षणाची ते बोंबाबोंब करत आहेत, त्यामुळे कोणाला किती सरकारी नोकऱ्या मिळणार याची त्यांना सुद्धा माहिती नाही. देशात ९५ टक्के नोकऱ्या या खासगीं क्षेत्रात आहेत आणि सरकारने तर जागोजागी कंत्राडी पद्धतीने नोकरभरती सुरु केल्या आहेत, म्हणजे शेवटी ते सुद्धा खासगी नोकरी प्रमाणेच आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात ‘एआय’ मुळे उरल्या सुरल्या सरकारी नोकऱ्यासुद्धा संपुष्टात येतील. अगदी सनदी अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा सुद्धा खासगी क्षेत्रातील उच्च पदावरील लोकांना खुल्या करण्यात आल्या आहेत. ज्या गोष्टींचा तरुण पिढीला भविष्यात काही फायदाच होणार नाही, मग या तरुणांना या आरक्षणाच्या मोहजालात मोदी सरकार का ढकलते आहे? केवळ लोकसभा निवडणुकीसाठी? हे भविष्यासाठी फार भीषण आहे.
तरुणांच्या मनात सरकारी नोकरीचे भूत उतरवून जर त्यांच्या वयाच्या मर्यादा वाढत राहिल्या आणि त्यावेळी सुद्धा जर ते बेरोजगार असतील तर त्यांना खासगी नोकरी मिळणे सुद्धा कठीण होऊन बसेल, हे वास्तव आहे. त्यामुळे मोदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही भावनिक साद म्हणजे तरुणांना मूर्ख बनविण्याचे धंदे आहेत असंच म्हणावं लागेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं