लष्कराच्या जीवावर स्वतःचा प्रचार करणाऱ्या मोदींना भारताने पाकिस्तानविरुद्ध २ युद्ध जिंकल्याचा विसर?

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पाक व्याप्त काश्मीरमध्ये एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, सदर कारवाईत भारतीय प्रसार माध्यमांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार किंवा भारतीय लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसताना स्वतःच निरनिराळी आकडेवारी जाहीर करण्याची स्पर्धा लावली होती.
काल भारतीय पायलट अभिनंदन भारतात सुखरूप परतले आणि देशात सर्वांनाच आनंद झाला. मात्र, घटनेच्या दुसऱ्या दिवसपासून सर्व विरोधी पक्ष शांत असताना देखील मोदींसकट संपूर्ण भाजप भारतीय जवानांच्या नावाने राजकरण करताना स्पष्ट दिसत आहे. एकप्रकारे लष्कराचा आधार घेऊन मोदींनी देशात स्वतःचाच उदो उदो सुरु केला आहे. भारतीय लष्कर आणि हवाईदलाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसताना मोदी त्याच्याच नावाने लोकसभेची तयारी करत असल्याचे जाणवते.
धक्कादायक म्हणजे कर्नाटक भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री येदुइरप्पा यांनी एअर स्ट्राईकमुळे कर्नाटकात भाजपच्या २२ जागा येतील असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजप भारतीय जवानांच्या बलिदानावर स्वतःच्या जागा वाढवत असल्याचं ध्यानात येत. सर्जिकल स्ट्राईकचा मोदी इतकं मार्केटिंग करत आहेत की त्यांना भारताने यापूर्वी १९६५ आणि १९७१ मध्ये पाकिस्तानबरोबर थेट युद्ध पुकारून त्यांना धूळ चारल्याचा विसरच पडला आहे. भारतीय जवान हे मी पंतप्रधान झाल्यावर धडाडीने काम करू लागल्याचा कांगावा ते करताना स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, याच शूर आणि धाडसी भारतीय सैन्याच्या बळावर याआधी देखील भारताने युद्ध जिंकली आहेत अशी आठवण करून देण्याची वेळ आली आहे. शहिदांच्या बलिदानावर स्वतःची मतपेटी घट्ट करणाऱ्या मोदी आणि भाजपवर दिवसेंदवस संशय गडद होताना दिसत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं