नरेंद्र मोदी १६ तारखेला यवतमाळच्या दौऱ्यावर

यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ फेब्रुवारीला यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, ते महिला बचत गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहून त्याठिकाणी ते सभा देखील घेणार असल्याचे वृत्त आहे. तशी अधिकृत माहिती केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
यावेळी पूर्वनियोजित भेटीप्रमाणे पांढरकवडाला जाणार असून तेथे महिला बचत गटांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. यवतमाळमध्ये महिला बचत गटाचं मोठं जाळं असून त्याकडे राजकारणात एक मतपेटी म्हणून देखील पाहिलं जात. त्यामुळे यावेळी यवतमालमधील तब्बल १७,००० पेक्षा अधिक महिला बचत गट उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.
सध्या येत असलेल्या निवडणूक सर्व्हेमध्ये भाजपाला हिंदी राज्यांच्या पट्यात मोठा फटका बसणार असल्याने भाजप इतर राज्यांवर अधिक लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये ज्याठिकाणी मोदींनी सभा घेतल्या तिथे पक्षाला मोठा फटका बसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोदी आता यवतमाळमध्ये येत असल्याने, राजकीय विश्लेषक विदर्भात भाजपबाबत वेगळेच संकेत देताना दिसत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं