प्रियंका गांधींचा आज लखनौमध्ये रोड शो, आजपासून भाजपविरोधात रिंगणात

लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने युपीच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पहिल्यांदाच युपीच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्याच्या पश्चिम भागाची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे हे सुद्धा उपस्थित असतील.
आज लखनौमध्ये भव्य रोडशोचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेसचे तिन्ही नेते लखनौच्या काँग्रेस मुख्यालयात जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतील. राहुल गांधी आजच दिल्लीला परतणार असून, प्रियंका गांधींचा दौरा मात्र ४ दिवसांचा असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, लखनौमध्ये प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांशी सध्यस्थितीबद्दल सविस्तर चर्चा करतील. तसेच लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रियंका गांधींचा हा दौरा काँग्रेससाठी खूप प्रतिष्ठेचा झाला आहे. यूपीत लोकसभेच्या तब्बल ८० जागा असून, त्यातील एकूण ४२ जागांची जबाबदारी प्रियंका गांधींकडे सोपविण्यात आली आहे. उत्तरेच्या पूर्व भागातील वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असून, तेथे प्रियंका यांचा लोकसभा निवडणुकीत किती प्रभाव पडतो याकडे सुद्धा राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं