प्रियंका गांधी देशभरात दौरे करतील: गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश निश्चित झाल्यावर आता त्यांना लवकरच काँग्रेस कार्यकारिणीमध्ये सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. तसे अप्रत्यक्ष संकेतच काँग्रेसमधून देण्यात आले आहेत. तसेच त्यांना केवळ पूर्व उत्तर प्रदेशातील प्रचारापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरविण्यात येईल असे संकेत सुद्धा देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रियंका गांधी या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणे दिसतात तसेच त्यांची भाषणशैली सुद्धा आक्रमक असल्यामुळे मतदारांवर त्यांचा उत्तम प्रभाव पडेल असं राजकीय निरीक्षकांना सुद्धा वाटत असल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. लवकरच लोकसभेचे बजेट अधिवेशन संपल्यानंतर काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात येईल असे वृत्त आहे. त्यावेळीच प्रियंका गांधींच्या काँग्रेसच्या प्रचार कार्यक्रमातील सहभागाची माहिती प्रसार माध्यमांना दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्या राहुल गांधींनंतर काँग्रेस पक्षातील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्या असतील यात वाद नाही. दरम्यान, काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत प्रियंका गांधी यांचा परीचय सर्व कार्यकारी सदस्यांशी करून देण्यात येईल आणि त्यानंतर प्रियंका गांधी यांचे स्थान अधोरेखीत केले जाईल असे वृत्त आहे.
दरम्यान, प्रियंका गांधींचा वावर केवळ पूर्व उत्तर प्रदेशपुरता मर्यादित नसून त्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभर काँग्रेसचा प्रचार करतील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं