पुण्यात हेल्मेट सक्ती; आंदोलनकर्त्यांनी भाजप आमदार मेधा कुलकर्णींना हुसकावून लावले

पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे शहरात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान, यावेळी भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णी सुद्धा उपस्थित होत्या. काही वेळाने आंदोलनकर्त्यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात करताच, उपस्थित आमदार मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री तुमच्या सोबत आहेत, असं आंदोलनकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या संवाद साधत असताना आंदोलनकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी मेधा कुलकर्णी थेट इथे दादागिरी करू नका, अशी घोषणाबाजी करत थेट हुसकावून लावले.
पुणे शहर वाहतुक पोलिसांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती केली आहे. त्याच्या निषेधार्थ शहरातील विविध संघटना एकत्रित आल्या आणि हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन केले. दरम्यान, या हेल्मेट सक्तीला आज महिना पूर्ण होत असल्याने हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीने महात्मा फुले मंडई चौकात जोरदार घंटानाद आंदोलन छेडण्यात आले आणि परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे, भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, नगरसेवक विशाल धनवडे, मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील, माजी नगरसेवक धनंजय जाधव, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे तसेच शहरातील अनेक संघटनाचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं